ताज्या बातम्या

आरसीएफ भरतीसाठी उमेदवारांना मार्गदर्शनाची सुवर्णसंधी; थळ युनिटमध्ये ११ जुलैला जागरूकता कार्यक्रम


अलिबाग : भारत सरकारच्या सार्वजनिक उपक्रमातील राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCF) मध्ये भरतीसंदर्भात ऑनलाइन परीक्षा होणार असून, त्यासाठी अर्ज केलेल्या रायगड जिल्ह्यातील उमेदवारांना मार्गदर्शन देण्यासाठी ‘भरतीपूर्व जागरूकता कार्यक्रम’ (Pre-Recruitment Awareness Programme) आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम ११ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत आरसीएफ कारखाना, थळ युनिट (ता. अलिबाग, जिल्हा रायगड) येथील समृद्धी सभागृहात पार पडणार आहे.

या कार्यक्रमात ऑनलाइन परीक्षेसंदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती, प्रश्नपत्रिकेचा प्रारूप, तयारीची दिशा आणि संबंधित विषयांवर तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन उमेदवारांना मिळणार आहे.

उमेदवारांना काय सोबत आणायचे?

ई-मेलवर आलेली वेळापत्रकाची हार्ड किंवा सॉफ्ट कॉपी

ओळखपत्राची छायाप्रती (प्राधान्याने आधार कार्ड / पॅन कार्ड / ड्रायविंग लायसन्स)


उमेदवारांनी ई-मेलमध्ये दिलेल्या वेळेनुसार समृद्धी सभागृहात वेळेवर उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरसीएफचे उपमहाप्रबंधक (मानव संसाधन/प्रशासन) प्रशांत पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button