ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

गणेशोत्सव मंडळांनी वीज सुरक्षेला प्राधान्य द्यावे – महावितरण


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

कल्याण : गणपती बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असतानाच महावितरणने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अधिकृत वीज जोडणी घेऊन सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले आहे.

गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्याने मंडळांना तात्पुरत्या जोडणीसाठी घरगुती दराने वीजपुरवठा मिळणार आहे. त्यामुळे अनधिकृत जोडण्या टाळून केवळ अधिकृत कंत्राटदारांकडूनच जोडणी घ्यावी, असेही महावितरणने सांगितले आहे.

सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या सूचना

वीज खांब व वाहिन्यांपासून सुरक्षित अंतर ठेवा

जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल वापरा

‘हुक’ टाकून वीज घेऊ नका

सुरक्षित व योग्य तारा/केबल वापरा, अर्थिंगची खात्री करा

मल्टीप्लगवर अनेक उपकरणे जोडणे टाळा

तात्पुरत्या जोडणीसाठीची अनामत रक्कम मंडळांना विनाविलंब परत केली जाईल. तसेच मदतीसाठी २४x७ टोल-फ्री क्रमांक उपलब्ध आहेत : 1800 212 3435 | 1800 233 3435 | 1912 | 19120.

“सुरक्षिततेसह बाप्पाचा उत्सव साजरा करूया,” असे आवाहन महावितरण, कोकण प्रादेशिक कार्यालय, कल्याण यांनी केले आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button