ताज्या बातम्याक्रीडारायगड
संस्कृती-धार्मिकतेचा जल्लोष, भक्ती-उत्साहाचा सोहळा; भाजपा दहीहंडी उत्सवात तब्बल १५ लाखांची पारितोषिके

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग : गोकुळाष्टमीच्या पारंपरिक जल्लोषात भक्तीचा रंग, उत्साहाचा झरा आणि स्पर्धेची धमाल घेऊन भारतीय जनता पार्टी, अलिबाग तालुका शनिवारी (१६ ऑगस्ट) भव्य ‘माजपा दहीहंडी उत्सव’ घेऊन सज्ज झाली आहे. तब्बल १५ लाख रुपयांची पारितोषिके विजेत्या पथकांच्या झोळीत पडणार असून, पुरुष व महिला दोन्ही गटांसाठी लाखो रुपयांची बक्षिसे, सलामी थरांचे मानकरी आणि लहानग्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा असा हा सोहळा रंगणार आहे, अशी माहिती भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस अॅडव्होकेट महेश मोहिते यांनी अलिबाग येथील भाजपा कार्यालयात दिली. याप्रसंगी चषकाचे अनावरण देखील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले
कार्यक्रमात पुरुष पथकासाठी प्रथम पारितोषिक 2,22,000 रुपये व चषक, तर महिला पथकासाठी प्रथम पारितोषिक 1,11,000 रुपये व चषक ठेवण्यात आले आहे. याशिवाय पुरुष सलामी (6 थर) – 11,000 रुपये, महिला सलामी (5 थर) – 15,000 रुपये अशी इतरही बक्षिसे असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत 42 संघाने नोंदणी केली आहे. त्यामध्ये अजूनही वाढ होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून भाजप नेते किरीट सोमय्या उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम स्थळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे अॅडव्होकेट महेश मोहिते यांनी सांगितले.

दुपारी ३ वाजता लहान बालगोपाळ फॅन्सी ड्रेस स्पर्धा होणार असून सर्व स्पर्धकांना रोख रकमेचे पारितोषिक देण्यात येईल. भाजपच्या जुन्या कार्यालयाजवळ दहीहंडी स्पर्धेचा थरार रंगणार आहे.
नोंदणीसाठी संपर्क रोहन भगत – ७५५८७४७६५४, सुयोग ठाकूर – ९८३४४४४३८२, गुरुत्व मोहिते – ७२७६३९२९६९
पारंपरिक व भव्य दहीहंडी सोहळा उत्साहात साजरा करावा, असे आवाहन दहीहंडी उत्सवाचे संयोजक अॅड. महेश मोहिते व अॅड. मनस्वी मोहिते यांनी अलिबागकरांना केले.
या प्रसंगी भाजपा रायगड जिल्हा महिला मोर्चाच्या प्रमुख चित्रा पाटील, अॅडवोकेट अंकित बंगेरा, सुनील दामले, अशोक वारगे, देवेन सोनवणे, राजेश पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
………