ताज्या बातम्यारायगड
“स्वाती सिनकर यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ”

अलिबाग : अलिबाग तालुक्यातील रामराज गावातील रहिवासी स्वाती संदीप सिनकर (वय ५६) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ पसरली आहे.
स्वाती या शेतकरी कामगार पक्षाचे अलिबाग पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष वागळे यांच्या छोट्या भगिनी होत. त्यांच्यावर रामराज येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह ग्रामस्थांनी उपस्थित राहून स्वाती यांना श्रद्धांजली वाहिली.त्यांच्या पश्चात पती संदीप सिनकर, मुलगा सुश्रुत, मुलगी सई तसेच सिनकर कुटुंबिय असा मोठा परिवार आहे.
त्यांचे दशक्रिया विधी सोमवारी (दि. १) व उत्तरकार्य गुरुवारी (दि. ४) रामराज येथील राहत्या घरी होणार असल्याचे नातेवाईकांनी कळविले आहे.




