ताज्या बातम्यारायगड
स्मृतीला हिरवाईची सर – पै. अन्वर बुराण यांच्या स्मृतिदिनानिमित्त झुंझारकडून वृक्षारोपण

अलिबाग प्रतिनिधी – झुंझार युवक मंडळ, पोयनाडचे माजी अध्यक्ष पै. अन्वर बुराण यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त ८ ऑगस्ट रोजी पोयनाड क्रीडांगण परिसरात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमासाठी लागणारी सर्व रोपे माणुसकी प्रतिष्ठान, रायगड चे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान यांनी मोफत उपलब्ध करून दिली. हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी बुराण कुटुंबियांनी पोयनाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला वॉटर प्युरिफायर भेट दिला.
कार्यक्रमाला झुंझार युवक मंडळाचे सचिव किशोर तावडे, खजिनदार दिपक साळवी, सुनील पाटील, माजी सरपंच भूषण चवरकर, सुजित साळवी, योगेश चवरकर, ॲड. पंकज पंडित, राजेंद्र जाधव, संदीप सावंत यांच्यासह मंडळाचे सदस्य व खेळाडू उपस्थित होते.