ताज्या बातम्या
48 अॅन्ड्रॉईड मोबाईल नागरिकांना केले परत

सीईआयआर या कार्यप्रणाली आली पोलिसांच्या कामी
रायगड : खोपोली पोलीस ठाणे हद्यीतील गहाळ झाले होते. पैकी एकुण 8,96,000/- रुपये किमतीचे एकुण 48 अॅन्ड्रॉईड मोबाईल सी.ई.आय.आर. या कार्यप्रणालीच्या माध्यमातुन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
खोपोली पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रातील 2025 या कालावधीत नागरीकांचे मोबाईल गहाळ झाले होते. गहाळ मोबाईलपैकी पोलिसांनी सी.ई.आय.आर. या माध्यमातुन जवळपास एकुण 48 अॅन्ड्रॉईड मोबाईल हस्तगत केले. पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या हस्ते मुळ मालकांना परत करण्यात आले. गहाळ झालेले मोबाईल परत मिळाल्यामुळे नागरीकांकडुन खोपोली पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तसेच यापुर्वी देखील खोपोली पोलीस ठाणेकडे सन 2023 ते 2025 या सालात गहाळ झालेल्या अॅन्ड्रॉईड मोबाईल पैकी एकुण 110 मोबाईल सी.ई. आय. आर. या माध्यमातुन हस्तगत करण्यात आलेले होते. आजपर्यंत एकुण 29,00,000/- रुपये किंमतीचे एकुण 158 अॅन्ड्रॉईड मोबाईल हस्तगत करण्यात आलेले असुन नागरीकांना परत देण्यात आलेले आहेत.
सदरची कामगिरी ही खोपोली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक शितल राउत, पोलीस शिपाई अमोल राठोड यांनी केली आहे.
…..