ताज्या बातम्यारायगड

प्रलंबित वादांची तडजोड करण्यासाठी न्यायालयीन मध्यस्थी मोहिमेस सुरुवात


रायगड : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व मध्यस्थी समुपदेशन प्रकल्प समिती यांच्या वतीने १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत एक विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेचा उद्देश म्हणजे न्यायालयात चालू असलेले वाद न्यायालयाच्या बाहेरच मध्यस्थीद्वारे समझोत्याने सोडवणे.

पक्षकारांनी या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी संबंधित न्यायालयाकडे प्रकरण मध्यस्थी केंद्राकडे पाठविण्याची विनंती करावी किंवा जिल्हा मध्यस्थी केंद्र, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग येथे थेट संपर्क साधावा.

पक्षकारांनी ही सुवर्णसंधी साधून आपले वाद विनाविलंब आणि शांततेच्या मार्गाने निकाली काढावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड यांच्याकडून करण्यात आले आहे.-

——–

संपर्कासाठी महत्त्वाचे क्रमांक:

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अलिबाग: 02141-223010 / मोबाईल: 8591903606

पनवेल: 022-27453019

माणगाव: 02140-263470

पेण: 02143-255520

कर्जत: 02148-222217

खालापूर: 02192-275228

उरण: 022-27222411

रोहा: 02194-232299

पाली: 02142-242382

महाड: 02145-222332

मुरुड: 02144-274038

श्रीवर्धन: 02147-222534

© 2025 SatyamevJayateNews.com सर्व हक्क राखीव.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button