ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

“कट्टा बाहेर काढला… ट्रिगर दाबलं… आणि गावाच्या अंगावर काटा आला!”


सत्यमेव जयते न्यू डॉट कॉम
रायगड : जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात विजयादशमीच्या पूर्वसंध्येला अक्षरशः फिल्मी ड्रामा रंगला. पोटलवाडीमध्ये मालदार कुटुंबातील दोन घरांमधील दशकभराचा वैर बुधवारी रात्री गोळीबारापर्यंत पोहोचला.
माजी सरपंच इस्माईल सैय्यद मालदार आणि गुलाम मालदार यांच्या घराण्यांमध्ये जागेवरून सतत कलह सुरू होता. नेहमीप्रमाणे वादविवाद चालू असतानाच अचानक गुलाम मालदार याचा मुलगा मुत्तीशने खिशातून देशी बनावटीचं पिस्तुल बाहेर काढलं. “धाडकन्!” गोळी इस्माईल मालदार यांच्या दिशेने झाडली आणि क्षणभरात सगळ्या गावाचं धडधडनं वाढलं.
सुदैवाने गोळी थेट लागली नाही. पण कट्ट्याच्या आवाजाने गावकऱ्यांच्या अंगावर काटा आला. परिस्थिती चिघळू नये म्हणून संतप्त ग्रामस्थांनी तिघांना जागेवरच पकडलं, तर गोळी झाडणारा मुत्तीश मात्र पळ काढण्यात यशस्वी झाला.
कर्जत पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपअधीक्षक राहुल गायकवाड आणि पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त लावला. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथकं रवाना झाली आहेत.
आरोप आहे की, “घरगुती भांडण आता सरळ दहशतीत बदललंय.” विजयादशमीच्या दिवशी घडलेली ही फिल्मी स्टाईल घटना आता संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.

Related Articles

Back to top button