ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
हेल्मेटपासून ‘गोल्डन अवर’पर्यंत… अलिबाग कॅम्पमध्ये रस्ता सुरक्षेचा मानवी चेहरा!

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
रस्ता सुरक्षा अभियान जानेवारी २०२६ अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण–रायगड यांच्या पुढाकाराने अलिबाग कॅम्प येथे आज एक वेगळ्याच धाटणीचा, नागरिकांच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी थेट नाते सांगणारा उपक्रम राबविण्यात आला.
माधव सूर्यवंशी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली येथे मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. केवळ नियमांची पुस्तकी माहिती न देता, प्रत्यक्ष आरोग्याची काळजी घेत नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेची जाणीव निर्माण करण्याचा हा उपक्रम विशेष ठरला.
या शिबिरात ९० नागरिकांची मोफत नेत्र तपासणी
७८ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
करण्यात आली.
वैद्यकीय पथकात डॉ. श्वेता कार्वेकर, डॉ. राजाराम हुलवान आणि डॉ. श्रद्धा कुदळे यांनी सेवा दिली. जिल्हा शल्य चिकित्सक, रायगड यांचे सहकार्य या उपक्रमाला लाभले.
दरम्यान, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, अलिबाग याबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी चिन्मय तळेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आणखी एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे प्रत्यक्ष वाहनचालकांना दिलेले मार्गदर्शन.
मोटार वाहन निरीक्षक सूर्यकांत गंभीर यांनी
हेल्मेट आणि सीटबेल्टचे महत्त्व, Walk on Right, Good Samaritans, Golden Hour, वाहन चालवताना मोबाईल वापरू नये. यासारख्या मुद्द्यांवर थेट संवाद साधत रस्ता सुरक्षेचा मंत्र दिला.
या उपक्रमाचे नियोजन किरण लोंढे, सहायक मोटार वाहन निरीक्षक अक्षय तुपसमुद्रे, विशाल जाधव यांनी केले. तसेच श्री साई मोटार ट्रेनिंग स्कूलचे मेहुल पाटील आणि रॉयल मोटार ट्रेनिंग स्कूलचे शैलेश घरत यांची उपस्थिती लाभली.
नियम नव्हे, जीवनाचा मंत्र!
आजचा हा उपक्रम केवळ प्रशासकीय कार्यक्रम न राहता, “अपघात टाळणे म्हणजे जीव वाचवणे” हा संदेश देणारा मानवी स्पर्श असलेले रस्ता सुरक्षा आंदोलन ठरले.
….


