स्वप्नपूर्तीकडे वाटचाल : उरणच्या वाचनालयातील चार विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

उरण : नगरपरिषदेच्या मा.साहेब मीनाताई ठाकरे वाचनालयातील ‘अभ्यासिका’ विद्यार्थ्यांसाठी यशदायी ठरत आहे. अभ्यासिकेतील चार विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केल्याने वाचनालयाच्या कार्यक्षमतेला नवे अधोरेखित मिळाले आहे.
उरण नगरपरिषदेच्या अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या मा. साहेब मीनाताई ठाकरे वाचनालयामध्ये अभ्यासिकेचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी मा. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही अभ्यासिका सुरू करण्यात आली. ग्रंथपाल संतोष पवार आणि सहाय्यक जयेश वत्सराज यांच्या देखरेखीखाली विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य वातावरण पुरवले जात आहे.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठीची तळमळ आणि अधिक वेळासाठीची मागणी लक्षात घेऊन, वाचनालय प्रशासनाने लवचिक वेळेत सुविधा पुरवली. याचे सकारात्मक परिणाम आता स्पष्ट दिसत आहेत.-
—
यशस्वी विद्यार्थ्यांची यादी:
1. मिनल जयेश घरत – मुंबई पोलिसात निवड
2. अंजली कोळी – BSF (Border Security Force) मध्ये सिलेक्शन
3. विघ्नेश रमेश कोळी – चार्टर्ड अकाउंटंट (C.A) फायनल यशस्वी
4. जयेश पाटील (माजी सैनिक) – एकाच वेळी तीन ठिकाणी यश:
मुंबई महापालिका – कर निरीक्षक
मुंबई महापालिका – कार्यकारी सहाय्यक
मंत्रालय – लिपिक पद
—-
विद्यार्थ्यांचे मनोगत
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेतील सकारात्मक वातावरण, मार्गदर्शन, आणि ग्रंथपाल व सहाय्यक कर्मचारी यांचे सततचे पाठबळ यांचे कौतुक केले आहे. त्यांनी उरण नगरपरिषदेचे विशेष आभार मानले आणि स्वतंत्र अभ्यासिका स्थापन करण्याची गरज व्यक्त केली.
त्यांचे म्हणणे आहे की, “अशी स्वतंत्र अभ्यासिका झाल्यास आमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या युगात अधिक चांगल्या संधी मिळतील.”
रण नगरपरिषद आणि मीनाताई ठाकरे वाचनालयाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सकारात्मक दिशा, प्रेरणा आणि यशाकडे वाटचाल करण्यासाठी योग्य मंच मिळतो आहे, हे या यशकथांवरून अधोरेखित होते.