ताज्या बातम्यारायगड
स्वच्छ श्वास, तंदुरुस्त पावले : नागाव वॉकथॉन २०२५

अलिबाग : “आपले गाव आपली ओळख आणि त्याची स्वच्छता आपली जबाबदारी” या घोषवाक्यासह नागाव ग्रामपंचायतीतर्फे ‘नागाव वॉकथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. गाव स्वच्छ, सुंदर आणि हिरवे ठेवण्याचा संदेश देण्यासाठी तसेच आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करण्यासाठी होणाऱ्या या उपक्रमात गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामपंचायत सदस्या हर्षदा मयेकर यांनी केले आहे.
हा वॉकथॉन १३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ७.३० ते १० या वेळेत पार पडणार आहे. मार्ग नागाव हायस्कूल ते नागाव हटाळे बाजार असा असेल. या उपक्रमाद्वारे नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत, इतरांना प्रेरणा देण्याचा उद्देश आहे.
ग्रामपंचायत टीमने “स्वच्छ नागाव, सुंदर नागाव” हे ध्येय साध्य करण्यासाठी एकत्र पाऊल टाकण्याचे आवाहन केले आहे.