ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल आता 21 डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट आदेश


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

नवी दिल्ली  : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार असल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला दुजोरा दिला आहे. निवडणुका अचानक पुढे ढकलण्यात आल्या होत्या, याला आव्हान देत राजकिरण बर्वे आणि एमआयएमचे प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद युसूफ पुंजानी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मतमोजणी तत्काळ घेण्याचीही त्यांनी मागणी केली होती.

या अर्जावर आज सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर तातडीची सुनावणी झाली. सुनावणीनंतर न्यायालयाने जिल्हा परिषदा, नगरपरिषद, नगरपंचायती आदी निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबरपूर्वी घोषित करण्यास स्पष्ट नकार दिला.
यासोबतच, राज्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया 31 जानेवारी 2026 पूर्वी पूर्ण करणे निवडणूक आयोगासाठी अनिवार्य असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.

Related Articles

Back to top button