ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

सुप्रसिद्ध ‘गोल्डन हिट्स’ लाईव्ह शो अलिबागमध्ये – दिग्गज गायकांच्या जादुई सुरांच्या सुवर्णयुगाची भव्य संध्यामैफल!

२२ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ९ वाजता पीएनपी थिएटर 


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

अलिबाग : अलिबाग शहरात संगीतप्रेमींना अविस्मरणीय संगीतमय सफरीला घेऊन जाणारा ‘गोल्डन हिट्स’ या शानदार लाईव्ह शोचे आयोजन २२ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ९ वाजता पीएनपी थिएटर येथे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकालाचे आवाज, धून, आणि आठवणी एकत्र येणार आहेत.
मुंबईच्या सुप्रसिद्ध कलाकारांच्या सहभागाने या कार्यक्रमात किशोरदा, आशाजी, एस. पी. बाळसुब्रमण्यम आणि लता दीदी यांच्या गाजलेल्या आणि काळाच्या आठवणीत जपलेल्या अमर गीतांचा संगम रसिकांना ऐकायला मिळणार आहे. ‘किशोर कुमार यांचा आवाज’ घेऊन येणारे राजू काजे आणि बहुढंगी गायिका प्रीती जोशी हे सेलिब्रिटी गायक म्हणून उपस्थित राहणार आहेत. याखेरीज संतोष ल्हासे (व्हॉइस ऑफ एस. पी. बाळसुब्रमण्यम), मन्जुषा कुलकर्णी (बहुढंगी गायिका), आणि छायाचित्रणातील लोकप्रिय अँकर डॉ. महेश हे मनोरंजनाचा फुल्ल डोस मिळवून देणार आहेत.
अतिशय मर्यादित तिकीट – संगीतप्रेमींनी घाई करा!
टिकिटांचे दर फक्त ४००, ३०० आणि २०० रुपये असून, १५ नोव्हेंबरपासून हॉलमध्ये आणि ५ नोव्हेंबरपासून सिंग अलोंग म्युझिक हबसुद्धा तिकीट उपलब्ध असतील. फोन बुकिंगसाठी ९३७१५ ४७९८८ या क्रमांकावर त्वरीत संपर्क साधावा.
संगीतमय आठवणींना उजाळा’गोल्डन हिट्स’ लाईव्ह शोमध्ये स्वरांच्या जादूने संध्याकाळ अविस्मरणीय होणार आहे. आपल्या सर्वांना या जिवंत कार्यक्रमाचा परिपूर्ण आस्वाद घ्यायचा असल्यास, तिकिटे तात्काळ बुक करा आणि संगीताच्या सुवर्णयुगात मनसोक्त रममाण व्हा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Back to top button