ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

सहयोग पतसंस्थेचा दिवाळीपूर्व सामाजिक उपक्रम : वृद्धाश्रमाला आर्थिक मदत


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

अलिबाग : सहयोग व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अलिबाग यांनी आपल्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करत एक सेवाभावी उपक्रम राबविला. संस्थेतील कर्मचारीवर्ग व स्वलपबचत प्रतिनिधींनी स्वतः वर्गणी जमा करून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा सामाजिक उपक्रम साकारला.

या अंतर्गत ॲड. जयेंद्र गुंजाळ संचलित ‘श्री समर्थकृपा वृद्धाश्रम, परहुर (ता. अलिबाग)’ या संस्थेला ₹२५,०००/- (पंचवीस हजार रुपये) इतकी आर्थिक मदत डिमांड ड्राफ्टद्वारे प्रदान करण्यात आली. हा धनादेश संस्थेचे व्यवस्थापक वैभव बोर्लीकर यांच्या हस्ते वृद्धाश्रमास सुपूर्त करण्यात आला.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष योगेश मगर, संचालक हरेश गायकर, मोहन वैद्य, कर्मचारी मयुरी ठाकूर, गणेश मौर्य, नरेंद्र पाटील, वैष्णवी पिंपळे, निलेश पाटील, रिया पाटील, पूर्वजा वेताळ, शुभम सुंकले तसेच स्वलपबचत प्रतिनिधी सुनिल तांडेल, अनिल आंबोले, गितेश गुरव, संदेश कवळे आणि वृत्तपत्र छायाचित्रकार जितु शिगवण उपस्थित होते.

या उपक्रमातून सहयोग पतसंस्थेने समाजातील वंचित व वृद्ध घटकांप्रती आपली सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव अधोरेखित केला आहे. त्यामुळे संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष अधिक अर्थपूर्ण व प्रेरणादायी ठरले आहे.


Related Articles

Back to top button