ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
शिक्षक होण्याचा मार्ग खुला : TAIT निकाल १८ ऑगस्टला
भावी शिक्षकांना लागली आजच्या निकालाचे प्रतीक्षा

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ चा निकाल सोमवार, दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर होणार असल्याची माहिती आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.
या परीक्षेसाठी एकूण २,२८,८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २,११,३०८ उमेदवार परीक्षेला हजर झाले. यामध्ये बी.एड. अभ्यासक्रमातील १५,७५६ तर डी.एल.एड. अभ्यासक्रमातील १३,४२ उमेदवारांनी हजेरी लावली.
परिषदेच्या माहितीनुसार, आतापर्यंत बी.एड.चे ९,९५२ आणि डी.एल.एड.चे ८२७ असे एकूण १०,७७९ उमेदवारांचे तपशील उपलब्ध झाले आहेत. मात्र, बी.एड.चे ५,८०४ व डी.एल.एड.चे ५१५ असे एकूण ६,३१९ उमेदवारांचे तपशील प्रलंबित आहेत. हे उमेदवार आवश्यक शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे निर्धारित मुदतीत परिषदेपुढे सादर न केल्यामुळे त्यांचा निकाल राखीव ठेवण्यात येणार आहे.
निकाल परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mscepune.in उपलब्ध होईल.
उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर वेळेत आवश्यक माहिती सादर न केल्यास त्याबाबत कोणतीही दाद दिली जाणार नसल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे.