ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

शहाबाजच्या खड्ड्यातून उघड झालं सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाचे बेशरम मौन, शेकापच्या ॲड. मानसी म्हात्रे ठरल्या माणुसकीच्या देवदूत!


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

रायगड : रात्रीचा अंधार… रस्त्यावरचा खड्डा… आणि त्यात घसरून रक्ताच्या थारोळ्यात तडफडणारे दोन तरुण. मदतीसाठी हात हलवत होते, पण गाड्या एकामागून एक सर्रास पुढे जात होत्या. हे दृश्य पाहून कुणाचं मन हललं नाही… पण एकाच व्यक्तीनं थांबून माणुसकी दाखवली ती शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांनी. सदरची घटना आज रात्री आठ वाजता घडली.

एका व्यक्तीच्या डोक्याला जबर दुखापत होऊन प्रचंड रक्तस्त्राव झाला होता. दुसऱ्या एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली होती. मानसी म्हात्रे यांनी गाडी थांबवली, स्वतः दोघांना उचलून पेझारी सरकारी दवाखान्यात दाखल केले आणि उपचार सुरू होईपर्यंत सोबत राहिल्या. पुढे उरणला पोहचवण्याचीही व्यवस्था करण्यात आली.

हा प्रसंग माणुसकीचा आदर्श ठरला, पण खड्ड्यांच्या नरकयुगावरही चिरफाड करतो.रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जीव धोक्यात येत आहेत. जनतेचे प्राण जात आहेत, पण सत्ताधारी आणि प्रशासन मात्र झोपले आहेत.

 

सण-उत्सवांच्या जाहिरातींसाठी, फुलांच्या हारांसाठी, आत्मप्रौढीच्या पोस्टर्ससाठी पैसा आहे; पण जीव घेणारे खड्डे बुजवायला पैसा नाही. इच्छाशक्ती नाही. जबाबदारी नाही.

अजून किती रक्त सांडलं तर सत्ताधारी जागे होतील? अजून किती अपघात झाले तर “विकास”च्या थाटातला दिखावा थांबेल? मानसी म्हात्रे यांनी दाखवली ती खरी समाजसेवा, खरी माणुसकी. पण सत्ताधारी आणि प्रशासनाची झोप मोडणार कोण? हा खरा प्रश्न आहे.

….


Related Articles

Back to top button