ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

“विद्यार्थ्यांसाठी नवा अध्याय : माणगांवच्या शाळेत गेल इंडिया लिमिटेडकडून विकासकामांची सुरुवात” खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

रायगड : “माणगांवच्या मुलांचे शैक्षणिक स्वप्न आता प्रत्यक्षात उतरतेय.” गेल इंडिया लिमिटेडच्या सीएसआर निधीतून मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे सीबीएसई स्कूलमध्ये विकासकामांची मुहूर्तमेढ रोवली गेली असून, खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते याचे भूमिपूजन झाले. आधुनिक पायाभूत सुविधांमुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि प्रेरणादायी वातावरण लाभणार आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षणाद्वारे समाजात सकारात्मक परिवर्तन घडवता येते, हे अधोरेखित करत तटकरे यांनी अशा विकासकामांमुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित, प्रेरणादायी आणि आदर्श शैक्षणिक वातावरण मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

या कार्यक्रमाला माजी आमदार अनिकेत तटकरे, ॲड. राजीव साबळे, सुभाष केकाणे, शर्मिला सुर्वे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.


Related Articles

Back to top button