ताज्या बातम्यामुंबईरायगड
“लोढा प्रकल्प: शहरातून परतलेल्या स्वप्नांची गोष्ट”
"स्वप्नं आता शहरात नाही, गावात उगम पावतात!"

अलिबाग : घरी परतलेलं स्वप्न… अलीबागच्या तरुणांची ‘लोढा’ यशोगाथा हळूहळू आकार घेत आहे. कधी काळी नोकरीच्या शोधात मांडवा, भग आणि धोकावडे या गावांमधून मुंबईकडे वळलेले तरुण आता पुन्हा आपल्या मातीकडे परत येऊ लागले आहेत. यामागचं कारण आहे – अलीबागमधील लोढा ग्रुपचा भव्य बांधकाम प्रकल्प, ज्यामध्ये स्थानिक तरुणांना प्राधान्य देऊन नोकरीची संधी दिली जात आहे.
धोकावडे गावचा ऋषिकेश गावंड हे त्याचं प्रेरणादायी उदाहरण. वाणिज्य शाखेत पदवी आणि व्यवस्थापनात शिक्षण पूर्ण करून ठाण्यात चांगल्या पगाराची नोकरी करणारा ऋषिकेश, लोढा अलीबाग प्रकल्पात संधी मिळताच गावी परतला. तो सध्या एचआर विभागात डिप्युटी एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो. त्याच्या मते, “ठाण्यात चांगली नोकरी होती, पण घरच्यांची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. आता कामही मनासारखं आहे आणि कुटुंबासोबत राहण्याचीही संधी आहे.”
अजय म्हात्रे यांचीही गोष्ट अशीच आहे. इलेक्ट्रिकल इंजिनीयर असूनही त्यांनी मुंबई आणि नवी मुंबईतील नोकऱ्या सोडून अलीबाग गाठलं. त्यांनी लोढा प्रकल्पात असिस्टंट साइट इंजिनिअर म्हणून जॉईन केलं. त्यांच्या आधीच्या कंपनीने ३० टक्के अधिक पगाराची ऑफर दिली होती, पण त्यांनी ती नाकारली. ते सांगतात, “आई-वडिलांसोबत राहता येणं, रोजचा प्रवास टाळणं आणि काम मनासारखं असणं – या सगळ्या गोष्टी अधिक महत्त्वाच्या वाटल्या.”
मुंबईतील मोठ्या कंपनीत सात वर्षं काम केलेले जिग्नेश पाटील आता लोढा अलीबाग प्रकल्पात सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतात. ते म्हणतात, “गावात काम मिळणं म्हणजे खरंच स्वप्न साकार झाल्यासारखं वाटतं. आता मी घरच्यांसोबत वेळ घालवतो आणि मनापासून कामही करतो.”
लोढा ग्रुपने स्थानिक विकासासाठी कटिबद्ध राहून गावागावात संपर्क साधायला सुरुवात केली आहे. त्यांनी स्थानिक तरुणांचे बायोडेटा संकलित करण्याची मोहीम सुरू केली आहे. पावसाळ्यानंतर अधिक अभियंत्यांची भरती केली जाणार असून, त्यात स्थानिकांना अग्रक्रम दिला जाणार आहे. त्यांच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं, “प्रकल्पाच्या सर्व स्तरांवर – कनिष्ठ ते वरिष्ठ – स्थानिकांना नोकरी देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
अलीबाग परिसरातील तरुणांसाठी ही केवळ एक संधी नाही, तर नव्या पर्वाची सुरुवात आहे. लोढा प्रकल्प हा केवळ इमारतींचं बांधकाम नाही, तर तो माणसांच्या आयुष्यांच्या उभारणीचा, गावात विकास रोवण्याचा आणि तरुणांच्या स्वप्नांना मुळांशी जोडण्याचा एक भक्कम प्रयत्न आहे.
……
“कामही आवडतं, आणि घरच्यांसोबत राहतानाचा आनंदही मिळतो,” – ऋषिकेश गावंड
—
“आधीच्या कंपनीने ३०% अधिक पगाराची ऑफर दिली होती. पण मी आईवडिलांसाठी अलीबाग गाठलं,” – अजय म्हात्रे
—
“गावात काम मिळणं हीच खरी प्रगती आहे. कुटुंबासोबत राहता येणं हा मोठा दिलासा आहे,” – जिग्नेश पाटील
—
लोढा ग्रुपचा पुढाकार – ‘स्थानिकांसाठीच प्रकल्प!’
लोढा ग्रुपच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं की,
“पावसाळ्यानंतर अधिक अभियंत्यांची भरती होणार असून, स्थानिकांना प्राधान्य दिलं जाईल. आम्ही गावागावात जाऊन तरुणांचे बायोडेटा गोळा करत आहोत.”
……