क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रायगडात भव्य मॅरेथॉन व विविध उपक्रम

२९ ते ३१ ऑगस्टदरम्यान क्रीडा संस्कृती जागवण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा उपक्रम


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

रायगड : हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन देशभर साजरा केला जातो. या निमित्ताने रायगड जिल्ह्यात २९ ते ३१ ऑगस्ट २०२५ दरम्यान विविध क्रीडा विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

क्रीडांचा प्रसार व्हावा, युवक-युवतींमध्ये क्रीडाविषयक वातावरण निर्माण व्हावे तसेच क्रीडा संस्कृतीचे संवर्धन व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

कार्यक्रमांचे वेळापत्रक

📌 २९ ऑगस्ट – सकाळी १० वाजता राष्ट्रीय व राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा भव्य सत्कार.

📌 ३० ऑगस्ट – जिल्ह्यातील शाळांमध्ये विविध क्रीडा स्पर्धा तसेच संघटनांच्या माध्यमातून चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन.

📌 ३१ ऑगस्ट, अलिबाग येथे – भव्य मॅरेथॉन स्पर्धा. यात १५ वर्षाखालील व १८ वर्षाखालील मुले-मुली, खुला गट (पुरुष व महिला) तसेच वरीष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी-कर्मचारी सहभागी होणार आहेत.

प्रमाणपत्रे व बक्षिसे

स्पर्धेत सहभागी सर्वांना प्रमाणपत्रे देण्यात येणार असून, विजेत्यांना आकर्षक ट्रॉफीज प्रदान करण्यात येतील.

अधिकाऱ्यांचे आवाहन

“राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रायगडातील खेळाडूंनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,”
– प्रकाश वाघ, जिल्हा क्रीडा अधिकारी


Related Articles

Back to top button