ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

रायगड पोलीस भरती लेखी परीक्षा अलिबागच्या जे.एस.एम. महाविद्यालयात; 1125 पैकी 1078 उमेदवार उपस्थित


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग  | 
रायगड जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेंतर्गत पोलीस शिपाई पदासाठी घेण्यात आलेली लेखी परीक्षा रविवारी (१५ मार्च) अलिबाग येथील जे.एस.एम. महाविद्यालयामध्ये शांततेत पार पडली. सकाळी ११ ते १२.३० या वेळेत ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी एकूण ११२५ उमेदवार पात्र होते. त्यापैकी १०७८ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली, तर ४७ उमेदवार गैरहजर राहिले.
या परीक्षेत पुरुष उमेदवारांची संख्या ९०२ इतकी होती. त्यापैकी ८५८ उमेदवार उपस्थित राहिले, तर ४४ उमेदवार अनुपस्थित होते. महिला उमेदवारांची संख्या २२३ असून त्यापैकी २२० उमेदवारांनी परीक्षा दिली, तर ३ महिला उमेदवार गैरहजर राहिल्या. परीक्षेसाठी उमेदवारांना सकाळी ८ वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
परीक्षा केंद्रात मोबाईल फोन, डिजिटल डायरी, स्मार्ट वॉच, मायक्रोफोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पोलीस प्रशासनाच्या कडेकोट बंदोबस्तात आणि देखरेखीखाली पार पडल्याची माहिती रायगड पोलिसांकडून देण्यात आली.
…..

Related Articles

Back to top button