ताज्या बातम्याक्रीडा

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित पंधरा वर्षाखालील मुलींचे प्रशिक्षण शिबिर कळंबोली येथे संपन्न


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

रायगड : जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पंधरा वर्षाखालील मुलींचे प्रशिक्षण शिबिर कळंबोली येथील किशोर गोसावी यांच्या स्पोर्टी- गो क्रिकेट अकॅडमी येथे संपन्न झाले.२३ ऑगस्ट व ४ सप्टेंबर अश्या दोन दिवसीय क्रिकेट शिबिरामध्ये रायगड जिल्ह्याच्या संघामध्ये निवड झालेल्या २३ मुलींनी सहभाग घेतला होता.

प्रशिक्षण शिबिरामध्ये मुलींना फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व यष्टिरक्षणाचे धडे तज्ञ प्रशिक्षक नयन कट्टा, विनय पाटील, देवदत्त शास्त्री यांच्याकडून देण्यात आले. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पंधरा वर्षाखालील मुलींचा संघ पुढील आठवड्यात पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरजिल्हा निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार असून स्पर्धेच्या पूर्व तयारी साठी सदरच्या शिबिराचे आयोजन आरडीसीए तर्फे घेण्यात आले होते. एमसीए तर्फे घेण्यात येणारी हि स्पर्धा एकदिवायी ३५ षटकांची असून प्रथम साखळी फेरीतील सामने होणार आहेत.रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने सातत्याने मुलींच्या क्रिकेटच्या प्रगतीकडे लक्ष दिले जात असून येणाऱ्या क्रिकेट हंगामात मुलींच्या जातीत जास्त क्रिकेट स्पर्धा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आरडीसीए तर्फे जाहीर करण्यात आले आहे.गतवर्षी रायगडच्या पंधरा वर्षाखालील मुलींच्या संघाने सुपर लीग पर्यन्त मजल मारली होती त्याच प्रमाणे यावर्षी देखील मुलींचा क्रिकेट संघ चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.मुलींच्या क्रिकेट संघाला रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील सचिव प्रदिप नाईक यांच्या सह सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


Related Articles

Back to top button