ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
रायगडातील १७ शिक्षक ठरले ‘आदर्श’; शिक्षक दिनी होणार सन्मान

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत दिला जाणारा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी रायगड जिल्ह्यातील १७ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. ही माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी दिली.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिनानिमित्त शिक्षकांच्या कार्याचा गौरव म्हणून जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतो.

यंदा अलिबाग तालुक्यातून मनोहर पाटील, पेण येथून किशोर पाटील, पनवेल येथून योगिनी वैदू, कर्जत येथून संज्योती कांबरी, खालापूर येथून किर्ती धारणे, उरण येथून अजित जोशी, सुधागड येथून वृषाली गुरव, रोहा येथून प्रसाद साळवी, महाड येथून वसंत साळुंखे, श्रीवर्धन येथून सीमा चव्हाण व नारायण खोपटकर, म्हसळा येथून शशीकांत भिंगारदेव, पोलादपूर येथून विजय पवार, माणगाव येथून सुजाता मालोरे व परेश अंधेरे, तळा येथून उल्का मोडकर, तर मुरुड येथून हेमकांत गोयजी या शिक्षकांची जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.




