ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

रायगडने पुरस्काराने पर्यावरण जिंकलं…. माझी वसुंधरात रायगडचा राज्यात दबदबा

आठ गावांचा हरित जल्लोष—५.५० कोटींच्या पुरस्कारांचा वर्षाव


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग  | 
राज्यातील बहुतांश जिल्हे अजूनही पर्यावरण मोहिमा फाइलपुरत्या ठेवत असताना, रायगड जिल्हा परिषदेन प्रत्यक्ष काम करून दाखवल आणि त्यामुळेच माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये राज्यात द्वितीय क्रमांक पटकावून रायगडने थेट राज्याला संदेश दिला… “पर्यावरण म्हणजे कार्यक्रम नाही, संस्कार आहे!” फक्त क्रमांक नाही… तर 8 ग्रामपंचायती, 5.50 कोटींची बक्षिसे आणि अनेक श्रेणींमध्ये अव्वल कामगिरी. रायगडचा हा निकाल आकड्यांपेक्षा मोठा ठरतोय, कारण यामागे आहे गावोगावी बदललेली मानसिकता. रायगडने पुरस्कार जिंकला नाही… तर गावकऱ्यांना पर्यावरण जिंकायला शिकवलं!
माझी वसुंधरा अभियान (1 जून 2024 – 31 मार्च 2025) दरम्यान डेस्कटॉप आणि  फिल्ड अशा दुहेरी तपासणीत रायगडची कामगिरी ठरली आणि इथेच रायगड इतरांपेक्षा वेगळा ठरला. अहवालासाठी नव्हे, तर खरंच बदल दिसणाऱ्या गावांसाठी गुण मिळाले. शिरवली (खालापूर) – राज्यात प्रथम भूमी थीम  1.50 कोटी आणि वडगाव (खालापूर) – राज्यात प्रथम 1 कोटी अशी कामगिरी झाली. तसेच विभागस्तरावर वासांबे, चौक, तांबाटी, तुपगाव, वडवळ, नारंगी या ग्रामपंचायतींनी प्रत्येकी 50 लाखांचे बक्षीस मिळवले. म्हणजेच रायगडमध्ये केवळ एक आदर्श गाव नाही… तर संपूर्ण जिल्हाच हरित प्रयोगशाळा बनतोय.
संदीप कराड – सर्वोत्तम गटविकास अधिकारी (कोकण विभाग) तसेच दिप्ती घाट (पोलादपूर) व शुभदा पाटील (रोहा) यांना जिल्हास्तर पुरस्कार मिळाला असून मुंबईत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 21 तारखेला सत्कार होणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली अभियान फक्त झाडे लावण्यापुरते न राहता स्वच्छता, पाणी, प्रदूषण, सहभाग या चार स्तंभांवर उभे राहिले. “पर्यावरणाबाबत सातत्याने चांगले काम सुरू असून नागरिकांना उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न आहे,”  नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी.

Related Articles

Back to top button