ताज्या बातम्या
राज्यस्तरीय पीकस्पर्धा जाहीर; शेतकऱ्यांसाठी लाखो रुपयांची पारितोषिके

रायगड : राज्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून पिकांची उत्पादकता वाढवावी आणि आपले कष्ट व कौशल्य सिद्ध करावे, यासाठी कृषी विभागामार्फत “राज्यस्तरीय पीकस्पर्धा 2025-26” जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उपसंचालक कृषी (माहिती), कृषी आयुक्तालय, पुणे यांनी केले आहे.
राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी विविध तंत्रज्ञान वापरून मिळवलेली उत्पादनक्षमता इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचा गौरव आणि प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते.
पीकस्पर्धेचा उद्देश:
उत्पादकतेत वाढ करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन
इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनाचे स्रोत तयार करणे
नवनवीन शेतीतंत्रज्ञानाचा प्रसार करणे
स्पर्धेची रचना:
गट: सर्वसाधारण व आदिवासी गट
स्तर: तालुका, जिल्हा व राज्य
हंगाम: खरीप (11 पीके), रब्बी (5 पीके)
अर्जासाठी अंतिम दिनांक:
मूग व उडीद: 31 जुलै 2025
भात, तूर, सोयाबीन इत्यादी: 31 ऑगस्ट 2025
रब्बी हंगामातील पीके: 31 डिसेंबर 2025
स्पर्धेतील पीके:
खरीप: भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सूर्यफूल
रब्बी: ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस
बक्षिसे (प्रत्येक गटासाठी):
तालुका पातळी:
प्रथम: ₹5,000
द्वितीय: ₹3,000
तृतीय: ₹2,000
जिल्हा पातळी:
प्रथम: ₹10,000
द्वितीय: ₹7,000
तृतीय: ₹5,000
राज्य पातळी:
प्रथम: ₹50,000
द्वितीय: ₹40,000
तृतीय: ₹30,000
अधिक माहिती व अर्जासाठी संकेतस्थळ:
www.krishi.maharashtra.gov.in