क्रीडारायगड

राजेश गोहिल ठरले पोयनाड कॅरम स्पर्धेचे विजेते १६८ खेळाडूंच्या सहभागात आंतरराष्ट्रीय खेळाडूची चमकदार कामगिरी


रायगड :  जिल्हा कॅरम असोसिएशन आणि झुंझार युवक मंडळ, पोयनाड यांच्या संयुक्त विद्यमाने जय मंगल कार्यालय येथे स्व. नथुरामभाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय पुरुष एकेरी कॅरम स्पर्धेचे आयोजन १९ व २० जुलै रोजी करण्यात आले.

या स्पर्धेत कामोठे येथील आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडू राजेश गोहिल यांनी अंतिम सामन्यात सचिन नाईक यांचा पराभव करत चॅम्पियनशिप पटकावली. विजेत्यांना रोख रु. ७,००० व झुंझारचे माजी अध्यक्ष पै. अन्वर बुराण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चषक देऊन गौरविण्यात आले.

उपविजेता म्हणून पनवेलच्या सचिन नाईक यांना रोख रु. ५,००० व चषक प्रदान करण्यात आला.
तृतीय क्रमांकावर अलिबागचे देवेन सिनकर (रु. २,५०० व चषक) तर चतुर्थ क्रमांकावर श्याम घायवत (रु. २,५०० व चषक) यांनी स्थान पटकावले.

इतर विजेते:

५वा क्रमांक – सुरेश बीस्त

६वा क्रमांक – निखिल कोशिमकर

७वा क्रमांक – अभिजित तुळपुळे

८वा क्रमांक – आशिष देशमाने
(प्रत्येकी रु. १,००० व चषक देऊन गौरव)

९ ते १६ क्रमांकावर असणाऱ्या खेळाडूंनाही उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील विविध विभागांतील १६८ खेळाडूंनी सहभाग घेतल्याने स्पर्धेला विशेष रंगत आली.

बक्षीस वितरण प्रसंगी उपस्थित मान्यवर:
गिरीष तुळपुळे (अध्यक्ष, जिल्हा कॅरम असोसिएशन), दीपक साळवी (सचिव), मनोहर पाटील, अभिजित तुळपुळे (सहसचिव), किशोर तावडे (सचिव, झुंझार मंडळ), तहसीन बुराण, नंदकिशोर चवरकर, अजय टेमकर, योगेश चवरकर, सुजित साळवी, ॲड. पंकज पंडित, भरतशेठ जैन (पोयनाड व्यापारी असोसिएशन), भूषण चवरकर (माजी सरपंच, पोयनाड), शैलेश पाटील (माजी सरपंच, आंबेपुर), स्वप्नील पाटील (शहापूर), राजेंद्र जाधव, चेतन पाटील आणि अनेक कॅरम प्रेमी.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button