ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
“यावेळी चूक होणार नाही!”– प्रभाग ७-ब मध्ये अंकित बंगेरा यांची धडाकेबाज प्रचार सुरुवात; मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवसेनेच्या नेत्या मानसी दळवी यांच्याहस्ते प्रचाराचा शुभारंभ

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग : नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७-ब चे भाजप उमेदवार एडवोकेट अंकित बंगेरा यांनी सोमवारी सायंकाळी मारुती मंदिर (वेधशाळा) आपल्या प्रचार मोहिमेला दमदार सुरुवात केली. शिवसेनेच्या नेत्या मानसी दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. सुरुवातीपासूनच भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने परिसर घोषणांनी आणि उत्साहाने गजबजला होता.

प्रचारातील पहिल्याच दिवशी बंगेरा यांनी प्रभागातील मतदारांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनी त्यांचे स्वागत करत उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या. काही मतदारांनी स्पष्ट शब्दांत व्यक्त केले की, “गेल्यावेळी आम्ही चुकीचा उमेदवार निवडला, पण यावेळी ती चूक पुन्हा होणार नाही.” या प्रतिक्रिया मिळताच बंगेरा यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणखीनच ठळकपणे दिसून आला.
मतदारांशी संवाद साधताना त्यांनी प्रभागातील विकासकामांवर भर देणार असल्याचा शब्द दिला. अलिबाग नगरपालिकेअंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, नालेटंचाई यांसह विविध मूलभूत समस्यांचे समाधान कायमस्वरूपी केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. “आता अलिबागमध्ये आश्वासन नाही, तर प्रत्यक्ष काम दिसेल,” असे सांगत त्यांनी भ्रष्टाचारमुक्त, नियोजनबद्ध आणि गतिमान विकासाचे आश्वासन दिले.

पहिल्याच दिवशी झालेल्या या जबरदस्त सहभागामुळे प्रभाग ७-ब मधील निवडणूक वातावरण चांगलेच तापले असून विरोधकांमध्ये या शक्तिप्रदर्शनामुळे खळबळ उडाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. बंगेरा यांचा प्रचार सुरू होताच निवडणुकीची चुरस उफाळून येत असून प्रभागातील स्पर्धा अधिक रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.



