ताज्या बातम्यारायगड
मातृशक्तीला भक्तीचा धागा – शिवसेनेच्या तीर्थयात्रेची सौजन्यपूर्ण भेट”
शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजा केणी व रसिका केणी यांच्या सौजन्याने तीर्थयात्रा सहल

रायगड : शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजाभाई केणी आणि महिला आघाडीच्या नेत्या रसिकाताई केणी यांच्या वतीने पोयनाड ते कुडूस विभागातील महिलांसाठी भव्य तीर्थयात्रा देवदर्शन सहल आयोजित करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून सलगपणे महिलांना अध्यात्मिक व धार्मिक पर्यटनाचा अनुभव देणाऱ्या या उपक्रमात यंदाही मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित आहे.
या तीर्थयात्रेमध्ये महिलांना खालील प्रमुख तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडवले जाणार आहे:
श्री क्षेत्र मढ
प्रति शिर्डी मंदिर
प्रति बालाजी मंदिर (2 ठिकाणे)
नारायणगाव दत्त मंदिर
श्री क्षेत्र जेजुरी
श्री क्षेत्र मोरगाव
श्री क्षेत्र आळंदी
श्री क्षेत्र देहू
आई एकविरा
यात्रेत सहभागी होण्यासाठी इच्छुक महिलांनी आपल्या गावातील शिवसेना शाखाप्रमुखांकडे नाव नोंदणी करावी.
नोंदणीची अंतिम तारीख: २० जुलै २०२५
नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क: शिवसेना जनसंपर्क कार्यालय, हेमनगर, अलिबाग
हा उपक्रम केवळ धार्मिक यात्राच नसून महिलांसाठी एक प्रेरणादायी आणि संघटनात्मक अनुभवही ठरणार आहे, असे राजा केणी यांनी सांगितले.
—