ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
महावितरणच्या विद्युत सुरक्षा अभियानाचे पाच नवे विक्रम; एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मानाचा मुकुट

मुंबई : शून्य विद्युत अपघाताच्या उद्दिष्टासाठी राबवलेल्या जनजागृती अभियानातून महावितरणने पाच नवे विक्रम प्रस्थापित करत एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे. सोमवारी (दि. ११) मुंबईत झालेल्या विशेष कार्यक्रमात या दोन्ही संस्थांच्या वतीने प्रमाणपत्रे व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली.
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबवण्यात आले. एशिया बुक ऑफ रेकॉर्डच्या परीक्षक कश्मिरा मयंक शाह यांनी पाचही विक्रमांची घोषणा करत संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक परेश भागवत (मानव संसाधन), प्रसाद रेशमे (प्रकल्प) आणि स्वाती व्यवहारे (वित्त) यांना गौरवचिन्हे प्रदान केली.
पाच विक्रमांत –
सुरक्षा संदेश देणारी मॅरेथॉन : ११,८८१ सहभागी
ऑनलाइन प्रश्नमंजूषा : ९६,१५० सहभागी
शालेय निबंध व चित्रकला स्पर्धा : ७,५९३ सहभागी
विद्युत सुरक्षा रॅली : २७,१५५ सहभागी
एकाचवेळी विद्युत सुरक्षेची शपथ : ४२,२०१ सहभागी
याशिवाय १ कोटी ९२ लाखांहून अधिक ग्राहकांना एसएमएसद्वारे आणि ३५ लाखांहून अधिक ग्राहकांना ईमेलद्वारे सुरक्षा संदेश पाठवण्यात आला. या सर्व उपक्रमांत एकूण २ लाख ११ हजारांहून अधिक नागरिक, विद्यार्थी, अभियंते व कर्मचारी सहभागी झाले.
एशिया बुक ऑफ रेकॉर्डकडून आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार पडताळणी झाल्यानंतर या विक्रमांची अधिकृत नोंद करण्यात आली.
कार्यक्रमात कार्यकारी संचालक परेश भागवत यांनी अभियानाची माहिती दिली, तर डॉ. संतोष पाटणी यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.
यावेळी अभियंते मनीष वाठ, दत्तात्रेय बनसोडे, प्रशांत दानोळीकर, हरिश गजबे, वादिराज जहागिरदार, दीपक कुमठेकर, मिलिंद दिग्रसकर, मुख्य महाव्यवस्थापक भूषण कुलकर्णी, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके आदी मान्यवर उपस्थित होते.