ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

भाजपचे एडवोकेट अंकित बंगेरा यांचा उमेदवारी अर्ज दाखल

भाजप पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवण्यावर ठाम, प्रभाग क्रमांक 7-ब मधील लढत तापण्याची शक्यता


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग : नगरपरिषद निवडणुकीत शनिवारी प्रभाग ७-ब मध्ये अक्षरशः शक्तीचा सूर्य उगवला! सुप्रसिद्ध कायदेपंडित ॲड. अंकित बंगेरा यांनी दणक्यात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपा अलिबागमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते. भाजपच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आगामी लढत तापण्याची चिन्हे अधिकच गडद झाली आहेत.

अर्ज दाखल करताना आमदार प्रशांत दादा ठाकूर, आमदार महेश बालदी, नेते आस्वाद (पप्पू शेट) पाटील, सरचिटणीस महेश मोहिते यांसह पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रचंड उपस्थितीने ७-ब प्रभागात भाजपने ‘आमची ताकद कोणाला कमी समजू नका’ असा थेट संदेश प्रतिस्पर्ध्यांना दिल्याचे स्पष्ट दिसले.

मतदारांच्या पाठिंबा मिळावा यासाठी एडवोकेट अंकित बंगेरा यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर जोर दिला आहे. एक उच्चशिक्षित, कायम मदतीला धावून जाणारा चेहरा म्हणून एडवोकेट बंगेरा यांची ओळख आहे. भारतीय जनता पक्षाने देखील त्यांना जोरदार पाठबळ दिले आहे. आपण पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचा विश्वास त्यांनी मतदारांना दिला. राजकारणातून समाजकारण साधणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एडवोकेट बंगेरा यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक सात ब मध्ये चांगलीच चुरस निर्माण झाल्याचे बोलले जाते.


Related Articles

Back to top button