ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
“प्रशांत नाईकांची चतुर चाल — भाजप बेहाल, उमेदवार मैदानात येण्यापूर्वीच बाद!” “शेकापच्या पहिल्या अचूक वाराने; भाजप-शिंदे युती गारठली!”

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : अलिबाग नगरपरिषद निवडणुकीत अजून प्रचारालाच सुरुवात व्हायची बाकी असताना शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) भाजप-शिंदे युतीच्या गोटात पहिला जोरदार धक्का देत विजयाची घंटा वाजवली आहे. प्रभाग क्रमांक २-ब मधून शेकापचे उमेदवार ॲड. प्रशांत नाईक हे बिनविरोध निवडून आल्यामुळे युतीच्या राजकीय गणिताची पहिलीच चाचपणी ढासळलेली दिसत आहे. भाजपाचे उमेदवार संतोष साळुंखे यांनी गुरुवारी (दि. २०) आपले नामनिर्देशन मागे घेतल्याने राजकीय गोलंदाजीतील ही ‘पहिली विकेट’ असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेचं केंद्र बनलं आहे.
शेकापच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी भवन परिसरात गुलाल, ढोलताशे आणि घोषणांनी जल्लोष सुरू केला असताना भाजप-शिंदे युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र शांतता, संभ्रम आणि न बोलता व्यक्त होणारी निराशा झळकत होती. “प्रशांत नाईक यांची चाल रोखता आली नाही, आता पुढची चाल काय?” असा प्रश्न युतीच्या बैठकीत पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे.
शहरात हा मुद्दा आता फक्त विजयानं मर्यादित न राहता “उमेदवार माघारी गेला की माघारी घ्यायला लावण्यात आला?” या संशयावर राजकीय चर्चा तापल्या आहेत.
काही निरीक्षकांनी टिप्पणी केली आहे की
“चारी बाजूंनी चाली लावून शेकापने भाजपला चारही मुंड्याचीत केले!”
या बिनविरोध निकालानंतर शेकाप आणि महाविकास आघाडीच्या गोटात उत्साहाची लाट उसळली असून हा विजय आगामी प्रभागांसाठी संकेत असल्याचे बोलले जात आहे. कारण राज्यातील स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हा शेकापचा पहिला अधिकृत विजय असून, त्याला प्रतीकात्मक आणि मानसिक दोन्ही महत्त्व मिळत आहे.
दरम्यान, ही सुरुवात आहे की पुढे अशाच धक्क्यांची मालिका? २ डिसेंबरनंतर याचं उत्तर मिळेल. पण आजचा स्कोअर स्पष्ट दिसतो
शेकाप : १ | भाजप-शिंदे युती : ०
….




