ताज्या बातम्यारायगड

“शोधली वाट… घडवली ओळख : रायगडच्या महिलांची मूर्तिमंत क्रांती”

२२४ बचतगट महिला बनवतायत १.५६ लाख गणेशमूर्ती!’


रायगड  : जिल्ह्यातील पेण तालुक्यातील महिला बचतगटांनी आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. ‘उमेद’ ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून तालुक्यातील २२८ महिलांनी गणपती मूर्ती बनवण्याच्या व्यवसायात यशस्वी वाटचाल सुरू केली आहे. यंदा या महिलांनी तब्बल १ लाख ५६ हजार २० गणपती मूर्ती तयार केल्या आहेत. त्यावर आता अखेरचा हात फिरवण्यात येत आहे. १,५०० गणपती मूर्ती परदेशात निर्यात करण्यात आल्या आहेत. त्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे.
या यशामागे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या पुढाकारामुळे महिलांना व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आणि आत्मविश्वासाने उभारी मिळाली.
पेण तालुका हा गणपती मूर्ती निर्मितीचा प्रमुख केंद्र मानला जातो. येथे तयार होणाऱ्या मूर्तींना देशविदेशात मागणी आहे. त्यातील सौंदर्य, कोरीवकाम आणि रंगसंगती हे या मूर्तींचे खास वैशिष्ट्य मानले जाते. या व्यवसायास भौगोलिक मानांकनही प्राप्त झाले आहे, आणि आता त्याच परंपरेत महिलांनी आपल्या कला-कौशल्याने स्थान निर्माण केले आहे.
‘उमेद’ अभियानांतर्गत महिलांना फिरता निधी, समुदाय गुंतवणूक निधी व बँकांकडून पतपुरवठा मिळाला. यामुळे मूर्ती निर्मितीचा व्यवसाय आकाराला आला आणि महिलांच्या हाताला काम मिळाले. विशेष म्हणजे, तयार केलेल्या मूर्तींपैकी १,५०० गणपती मूर्ती परदेशातही निर्यात करण्यात आल्या आहेत.
पाहणी दौरा आणि आश्वासन
या यशाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  नेहा भोसले आणि प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे यांनी बचतगट महिलांच्या कार्यशाळेला भेट दिली. त्यांनी मूर्ती निर्मितीतील बारकावे समजून घेतले, अडचणी जाणून घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी मदतीचे आश्वासनही दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button