ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

“परंपरा, संस्कृती आणि स्वादाचा संगम –  अलिबागमध्ये रंगणार ‘महाभोंडला, खिरापत स्पर्धा”!

शिवसेना महिला संघटनेचा उपक्रम


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : परंपरेचा वारसा, संस्कृतीचा संगम आणि आनंदसोहळ्याचा उत्सव घेऊन येतो आहे शिवसेना महिला संघटना अलीबाग आयोजित ‘महाभोंडला व खिरापत स्पर्धा’! आगामी २४ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० वाजता हा सोहळा क्षेत्रोत्री माळी समाज हॉल, कुरुळ, अलीबाग येथे मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. ‘उत्तम सखी संस्था’ या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या या कार्यक्रमात अलीबागच्या महिला एकत्र येऊन पारंपरिक भोंडला साजरा करतील.
 ढोल, ताशे, गाणी, पारंपरिक खेळ आणि रंगीबेरंगी खिरापतींची चव – सगळ्याच वातावरणात उत्साहाची लहर पसरवणार आहे.
 महिलांसाठी खास खिरापत स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, नाविन्यपूर्ण व आकर्षक खिरापतींना विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत.
 यासोबतच नवरात्री निमित्त कृतिवान महिलांचा व महिला भजनी मंडळांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. ते म्हणजे
श्रावणी भोंडला ग्रुप, डोंबिवली यांचा खास कलाविष्कार, जो प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहे.
कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी मोठ्या संख्येने महिला सहभागी होणार आहेत. शहरातील नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहून या सांस्कृतिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संपर्क :
 8380055630 / 7263804344
“नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा! परंपरेचा आनंद आणि संस्कृतीचा अभिमान साजरा करूया महाभोंडल्यासह!”, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button