ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

“जेष्ठ पत्रकार लोकशाहीचे बळ” – केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन

देशभरातील १२० जेष्ठ पत्रकारांच्या उपस्थितीत राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
केरळ : “जेष्ठ पत्रकार आपल्या लेखणीतून नागरिकांना सतर्क ठेवतात आणि राजकीय नेत्यांच्या चुका दाखवून लोकशाही बळकट करतात,” असे प्रतिपादन केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी त्रिवेनपुरम येथे झालेल्या जेष्ठ पत्रकारांच्या राष्ट्रीय संमेलनात केले.
त्रिवेनपुरम (केरळ) येथे झालेल्या जेष्ठ पत्रकारांच्या राष्ट्रीय संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पत्रकारितेच्या भूमिकेवर भाष्य करताना सांगितले की, “जेष्ठ पत्रकार अनुभवाच्या बळावर समाजाला सजग ठेवतात. त्यांच्या लेखणीतून लोकशाही अधिक सक्षम होते. त्यामुळे केंद्र सरकारने चौथ्या स्तंभाला समान सुविधा द्याव्यात,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
केरळ ज्येष्ठ पत्रकार फोरमतर्फे आयोजित या संमेलनात महाराष्ट्राचे डॉ. जयपाल परशुराम पाटील यांची जेष्ठ पत्रकार फेडरेशनच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड झाली. तसेच, राष्ट्रीय स्तरावरील सर्व पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. अध्यक्षपदी संदीप दीक्षित (दिल्ली), उपाध्यक्षपदी आनंदम पुलिपालुपुला (तेलंगणा), सुहासिनी प्रभुगोंकर (गोवा), डॉ. टी. जनार्डन (आंध्र प्रदेश) आणि चंद्रप्रकाश भारद्वाज (मध्य प्रदेश) यांची निवड झाली.
सरचिटणीसपदी एन. पी. चेक्कट्टी (केरळ), सचिवपदी के. संथाकुमारी (कर्नाटक), कान्हू नंदा (ओडिशा), आर. रंगराज (तामिळनाडू) आणि डॉ. जयपाल परशुराम पाटील (महाराष्ट्र) यांची निवड झाली. कोषाध्यक्ष म्हणून के. पी. विजयकुमार (केरळ) यांची निवड करण्यात आली. विविध राज्यांतील १० प्रतिनिधी कार्यकारी समितीत समाविष्ट झाले.
नव्या कार्यकारिणीने देशातील जेष्ठ पत्रकारांना आरोग्य सेवा आणि रेल्वे सवलतींचा लाभ देण्यासंबंधीचे निवेदन लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सादर करण्याचा निर्णय घेतला.
या संमेलनात देशभरातील १२० जेष्ठ पत्रकार सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ पत्रकार फ्रँक लुईस यांनी केले.

Related Articles

Back to top button