ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

जागतिक अस्थिरतेत भारत ‘विश्वासार्ह दीपस्तंभ’ – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

भारत हा धोरणात्मक स्वायत्तता, शांतता आणि सर्वसमावेशक विकासाचे प्रतीक असल्याचे त्यांनी अधोरेखित केलेइं. डिया–मिडल ईस्ट–युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर’ या योजनेद्वारे भविष्यातील व्यापार मार्गांचे पुनर्निर्धारण


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

मुंबई : जागतिक तणाव, व्यापारातील अडथळे आणि पुरवठा साखळीतील बदलांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भारताला जगासाठी “स्थिर दीपस्तंभ” म्हणून सादर केले.

मुंबईत आयोजित ‘इंडिया मॅरिटाईम वीक 2025’ या कार्यक्रमातील ‘मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह’ मध्ये बोलताना मोदी म्हणाले, “भारत हा धोरणात्मक स्वायत्तता, शांतता आणि सर्वसमावेशक विकासाचे प्रतीक आहे. आमचे लोकशाही मूल्य आणि विश्वासार्हता हिच खरी भारताची ताकद असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या प्रसंगी राज्यपाल आचार्य देवव्रत,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल,
केंद्रीय राज्य मंत्री (बंदरे, नौवहन आणि जलमार्ग) शांतनु ठाकूर, केंद्रीय राज्य मंत्री (परराष्ट्र व्यवहार) कीर्तीवर्धनसिंग, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,
तसेच शिपिंग, बंदर, व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर अधिकारी, उद्योगपती आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

मोदी म्हणाले, “जेव्हा जगातील समुद्र अस्थिर होतात, तेव्हा जग एक स्थिर दीपस्तंभाच्या शोधात असतात. त्यांच्यासाठी भारत हा देश त्या दीपस्तंभाची भूमिका निभावू शकतो.” असे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, भारताचे सागरी आणि व्यापारी उपक्रम ही व्यापक दृष्टिकोनाचा एक भाग आहेत. ‘इंडिया–मिडल ईस्ट–युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर’ या योजनेद्वारे भविष्यातील व्यापार मार्गांचे पुनर्निर्धारण होत आहे.

“भारताचा सागरी क्षेत्र झपाट्याने प्रगती करत आहे. आपल्या बंदरांची कार्यक्षमता आता विकसनशील देशांमध्ये सर्वोत्तम मानली जाते,” असे ते म्हणाले.

मोदी यांनी सांगितले की, “शंभर वर्षांहून जुने वसाहती काळातील नौकानयनाचे कायदे आम्ही बदलून आधुनिक आणि भविष्याभिमुख कायदे लागू केले आहेत. हे नवीन कायदे राज्य सागरी मंडळांची भूमिका मजबूत करतात आणि बंदर व्यवस्थापनात डिजिटल तंत्रज्ञानाचा समावेश करतात.”

‘मॅरिटाईम इंडिया व्हिजन’ अंतर्गत १५० हून अधिक उपक्रम राबवले गेले असून, त्यामुळे सागरी क्षेत्रात मोठे बदल घडले आहेत. मोठ्या बंदरांची क्षमता दुप्पट झाली आहे आणि जहाजांच्या फेरफटक्यांचा वेळ लक्षणीयरीत्या कमी झाला आहे, असे मोदी यांनी सांगितले.

क्रूझ पर्यटनाला चालना मिळाली असून, अंतर्देशीय जलमार्गांनीही उल्लेखनीय प्रगती केली आहे. “मालवाहतुकीत ७०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कार्यरत जलमार्गांची संख्या तीनवरून ३२ वर पोहोचली आहे,” असे त्यांनी नमूद केले.

“आपल्या बंदरांचा निव्वळ वार्षिक नफा मागील दशकात नऊपट वाढला आहे,” असेही मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी सांगितले की, सागरी क्षेत्र भारताच्या वाढीचे मुख्य इंजिन ठरत आहे. गेल्या दशकात व्यापार, बंदर आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठी झेप घेतली आहे.

“२१व्या शतकातील एक चतुर्थांश कालावधी संपला आहे. पुढील २५ वर्षे निर्णायक असतील. त्यामुळे आमचा भर ‘ब्लू इकॉनॉमी’ आणि ‘शाश्वत किनारी विकास’ यावर आहे,” असे मोदी म्हणाले.

“हिरव्या लॉजिस्टिक्स, बंदर जोडणी आणि किनारी औद्योगिक क्लस्टर्सवर आमचा विशेष भर आहे. पुढील पिढीच्या सुधारणांसाठी आम्ही वेगाने पुढे जात आहोत,” असे ते म्हणाले.

“२०२५ हे वर्ष भारताच्या सागरी क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरले आहे. देशाचे पहिले खोल पाण्याचे आंतरराष्ट्रीय ट्रान्सशिपमेंट हब — विझिनजम पोर्ट — या वर्षी कार्यान्वित झाले. याच पोर्टवर नुकतेच जगातील सर्वात मोठे कंटेनर जहाज थांबले, आणि ही घटना भारताच्या सागरी सामर्थ्याचा पुरावा आहे,” असे मोदी म्हणाले.

मुंबईत झालेल्या इंडिया मॅरिटाईम वीक 2025 अंतर्गत मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये भाषण करताना मोदी म्हणाले, “भारत हा धोरणात्मक स्वायत्तता, शांतता आणि सर्वसमावेशक विकासाचे प्रतीक आहे. आमचे लोकशाही मूल्य आणि विश्वासार्हता हिच भारताची खरी ताकद आहे.”


Related Articles

Back to top button