ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

“जनसुरक्षा विधेयकाविरोधात राज्यभर स्फोटक आंदोलनाची घोषणा; १४ ऑगस्टला मुंबईत निर्धार परिषद”

मुंबईत जनतेचा ज्वालामुखी फुटणार, जनसुरक्षा नव्हे, जनहक्क सुरक्षेसाठी लढा!


मुंबई : जनतेच्या हक्कांवर गदा आणणारे, घटनाविरोधी आणि सत्ताधाऱ्यांना अमर्याद अधिकार देणारे ‘महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४’ सरकारने पाशवी बहुमताच्या जोरावर मंजूर केले; आणि आता त्याविरोधात राज्यभर निर्णायक आंदोलनाची ठिणगी पडली आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला, १४ ऑगस्ट रोजी दुपारी १ ते ५ या वेळेत मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भव्य ‘निर्धार परिषद’ होणार असून यामध्ये राज्यव्यापी आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.
९५०० हरकतींचा भंग – लोकशाही प्रक्रियेवर तुटपुंजा विश्वास
या विधेयकाविरोधात राज्यभरातून तब्बल १३ हजार हरकती दाखल झाल्या होत्या, त्यापैकी ९५०० हरकती ‘कायदा रद्द करा’ या ठाम मागणीच्या होत्या. हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठे विरोध नोंदवण्याचे उदाहरण ठरले. मात्र, या सर्व हरकतींना पायदळी तुडवत सरकारने कायदा मंजूर केला.
मान्यवरांचा जमाव – सरकारला थेट इशारा
निर्धार परिषदेत पी. साईनाथ, किरण माने, सुरेश खोपडे, संभाजी भगत, प्रज्ञा पवार, तुषार गांधी, ॲड. मिहिर देसाई, तिस्ता सेटलवाड, आनंद पटवर्धन यांच्यासह अनेक कलाकार, वकील, साहित्यिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते हजेरी लावणार आहेत.
महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, शरद पवार हेही सहभागी होणार असून, या परिषदेतून सरकारविरोधी संघर्षाचा रोडमॅप जाहीर होईल.
आयोजकांचा इशारा
भाकप, माकप, शेकाप, माले, समाजवादी पक्ष, सकप, भारिप(से), भारत जोडो अभियान, श्रमिक मुक्ती दल व जनआंदोलनाची संघर्ष समिती यांनी स्पष्ट केले आहे – “हा कायदा रद्द होईपर्यंत लढा सुरू राहील. आता जनतेचा आवाज दडपता येणार नाही.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button