ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
“चोंढीतला बॅलन्स बदलला! दिलीप भोईर आणि सहकाऱ्यांना हाईकोर्टाचा मोठा दिलासा”
चोंढी प्रकरणात दिलीप भोईरांसह 21 जणांना मुंबई उच्च न्यायालयातून जामीन

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग : रायगडातल्या गाजलेल्या चोंढी मारहाण प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेले शिवसेनेचे नेते दिलीप भोईर उर्फ छोटम यांच्यासह 21 जणांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे भोईर आणि समर्थकांना मोठा दिलासा मिळाल्याचे बोलले जाते.
११ सप्टेंबर २०१२ रोजी चोंढी गावात झालेल्या वादातून काँग्रेस नेते विजय थळे, त्यांच्या पत्नी रूपाली थळे आणि इतर कार्यकर्त्यांवर हल्ला झाला होता. या प्रकरणात हाफ मर्डर आणि मारामारीचे गंभीर गुन्हे दाखल झाले होते.
या खटल्यात एकूण २५ आरोपी होते. काही दिवसांपूर्वी अलिबाग न्यायालयाने दिलेल्या निकालात चार आरोपींना निर्दोष मुक्तता देण्यात आली होती, तर उर्वरित आरोपींना दोषी ठरवण्यात आले होते.
या प्रकरणात मुख्य आरोपी असलेले दिलीप भोईर हे त्या काळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती होते. त्यांना कोठडीत जावे लागल्याने हे प्रकरण त्या वेळी राज्यभर चर्चेत आले होते.
गुन्हा दाखल झाल्यानंतर भोईर जवळपास पावणेदोन महिने फरार राहिले होते. अटकपूर्व जामीन फेटाळल्याने अखेर त्यांनी न्यायालयात शरणागती पत्करली होती.
आता उच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनामुळे आरोपींना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी पुढील न्यायालयीन प्रक्रिया आणि अंतिम शिक्षा काय ठरेल याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
….



