ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

खालापूरमधील रिसॉर्टमध्ये चोरी; तीन आरोपी अटकेत, १८.७६ लाखांचा मुद्देमाल जप्त


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
अलिबाग  |
 खालापूर तालुक्यातील खैराट येथील सॉल्ट रिसॉर्ट अँड ओलीयंडर फार्म येथे पर्यटकाच्या रूममधील लॉकरमधून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याप्रकरणी खालापूर पोलिसांनी तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १८ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपल्या पत्नीसह नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यासाठी सैराट येथील सॉल्ट रिसॉर्ट अँड ओलीयंडर फार्म येथे २५ जून २०२६ रोजी आले होते. त्यांना राहण्यासाठी देण्यात आलेल्या रूममधील लॉकरमध्ये त्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम ठेवली होती. दरम्यान अज्ञात व्यक्तींनी रूममध्ये प्रवेश करून लॉकर उघडून १८ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि ६ हजार ५०० रुपये रोख रक्कम असा एकूण १८ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी रिसॉर्टमधील दोन सिक्युरिटी गार्डसह तिघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी ३ मार्च २०२६ रोजी तिघांनाही अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा १८ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मयूर किसन आगिवले (२४), प्रविण कृष्णा सगणे (२५) आणि ओमकार दत्ता सरोडे (२५), सर्व रा. कर्जत अशी आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या पथकाने केली.
…..

Related Articles

Back to top button