क्रीडाताज्या बातम्यारायगड
कुस्तीच्या डावपेचाचे मैदान अलिबागमध्ये सज्ज — नागपंचमीच्या दिवशी रंगणार पहिली हंगामी कुस्ती स्पर्धा

रायगड : कोकणातील पावसाळी हंगामात कुस्तीप्रेमींसाठी एक पर्वणी ठरणारी कुस्ती स्पर्धा येत्या २९ जुलै २०२५ रोजी मंगलवारी अलिबागमध्ये रंगणार आहे. नागपंचमीच्या शुभमुहूर्तावर महावीर ग्रामस्थ मंडळ, खंडाळे (अलिबाग) यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
दुपारी २ वाजता सुरू होणाऱ्या या स्पर्धेमध्ये परिसरातील नामवंत मल्ल आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. नवीन कुस्तीप्रेमी, खेळाडू, वस्ताद व पंच यांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या उपक्रमामागे श्री. जयेंद्र काशिनाथ भगत, अध्यक्ष – रायगड जिल्हा कुस्तीगीर संस्था यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
कुस्तीप्रेमींसाठी ही संधी अत्यंत महत्त्वाची असून, कोकणातील मातीतल्या कुस्तीची परंपरा अनुभवण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.