क्रीडाताज्या बातम्यारायगड

“आदिवासी खेळाडूंना राष्ट्रीय मंचाची दारं उघडी! – डॉ. जयपाल पाटील यांचे आवाहन”


अलिबाग | प्रतिनिधी
राज्यातील अनुसूचित जमातींमधील कबड्डी, खो-खो, अ‍ॅथलेटिक्स, आर्चरी आणि कुस्ती यासारख्या खेळांमध्ये जिल्हा व तालुका स्तरावर प्रावीण्य मिळवलेल्या आदिवासी मुला-मुलींसाठी एक खास संधी उपलब्ध झाली आहे. नाशिक येथील आदिवासी क्रीडा प्रबोधिनीच्या वतीने 31 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान क्रीडा नैपुण्य निवड चाचणी शिबीर आयोजित करण्यात आले असून, यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रा. डॉ. जयपाल पाटील यांनी केले आहे.

प्रा. पाटील यांनी सांगितले की, “राज्यातील आदिवासी समाजातील खेळाडूंना केवळ जिल्हा किंवा राज्य नव्हे, तर देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवायचं आहे. ही मुले भविष्यात ऑलिम्पिक पदक विजेतेही ठरू शकतात.”

➤ निवड चाचणीसाठी पात्रता:

वय गट: 12 ते 15 वर्षे (1 जानेवारी 2011 ते 31 डिसेंबर 2014 दरम्यान जन्म झालेले)

दाखल करावयाची कागदपत्रे:

जात प्रमाणपत्र

जन्म दाखला

शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र

आधार कार्ड

वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र

उत्पन्न प्रमाणपत्र

खेळातील विशेष प्रावीण्य प्रमाणपत्र

क्रीडा गणवेश

 

➤ निवड चाचणीचे वेळापत्रक:

मुले: 31 जुलै व 1 ऑगस्ट – सकाळी 7 ते सायंकाळी 5

मुली: 1 ऑगस्ट व 2 ऑगस्ट – सकाळी 7 ते सायंकाळी 5

स्थळ: विभागीय क्रीडा संकुल, हिरावाडी, नाशिक

➤ संपर्क:

सहभाग इच्छुकांनी 27 जुलैपर्यंत प्रकल्प अधिकारी श्री. अरुणकुमार जाधव यांच्याशी संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक: 8856044955 / 9422532007

प्रा. पाटील यांनी शेवटी सर्व समाजसेवक, क्रीडाप्रेमी, आणि सोशल मीडियावरील मित्रांना आवाहन केलं की, “गावातील खेळात प्रावीण्य मिळवलेल्या आदिवासी मुलांना या संधीबद्दल जरूर कळवा. ही मुले आपल्या गावाचे व देशाचे नाव उज्वल करतील.”


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button