ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड
भ्रष्टाचारविरोधी लढ्यात धनंजय म्हात्रे यांना मोठी जबाबदारी
‘एन्टि करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया’च्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड

मुंबई : देशपातळीवरील भ्रष्टाचारविरोधी संघटना एन्टि करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया (Anti Corruption Foundation of India) च्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते धनंजय प्रभाकर म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनेचे राष्ट्रीय सुप्रिमो श्री. नरेंद्र अरोरा यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच अधिकृत कोअर कमिटी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये देशभरातील विविध राज्यांतील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या यादीत धनंजय म्हात्रे यांचा उल्लेख राष्ट्रीय सरचिटणीस, इंडिया या जबाबदारीसह करण्यात आला आहे.
धनंजय म्हात्रे हे गेल्या अनेक वर्षांपासून भ्रष्टाचारविरोधी जनजागृतीसाठी कार्यरत असून, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग आहे. या निवडीबाबत प्रतिक्रिया देताना म्हात्रे म्हणाले, “ही जबाबदारी मला अधिक प्रामाणिकपणे कार्य करण्यासाठी प्रेरणा देईल. संस्थेचे आभार मानत मी ही भूमिका पूर्ण निष्ठेने पार पाडण्याचा प्रयत्न करेन.”
एन्टि करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया ही संस्था निती आयोग, MSME मंत्रालय व I.T. अधिनियम अंतर्गत नोंदणीकृत असून, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनद्वारे प्रमाणित आहे.