ताज्या बातम्यारायगड

F80 फिटनेस स्टुडिओचा ‘फिटनेस टू फॉरेस्ट’ उपक्रम – जलाराम मंदिर परिसरात वृक्षारोपण!


  1. अलिबाग : अलिबागमधील F80 फिटनेस स्टुडिओच्या वतीने पर्यावरण जपण्याचा सकारात्मक संदेश देत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम सहान बायपास येथील जलाराम मंदिर परिसरात उत्साहात पार पडला.

या उपक्रमात जिमचे संस्थापक व प्रमाणित फिटनेस ट्रेनर अद्वैत पाटील, प्रशिक्षक अंकुश ठाकूर आणि सुमारे ५० सदस्य सहभागी झाले होते. यावेळी काजू, आवळा, बांबू, बेल अशा विविध प्रजातींची सुमारे ३५ झाडे लावण्यात आली. विशेष म्हणजे, झाडे लावून थांबण्याऐवजी त्यांचे नियमित संगोपन करण्याचाही संकल्प सर्वांनी केला.

जलाराम मंदिराचे मालक जितेंद्र मेहता यांनी त्यांच्या मंदिर परिसरात झाडे लावण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली, तर वन विभागाचे अधिकारी नरेंद्र पाटील यांनी वृक्षांची उपलब्धता करून देत सहकार्य केले. F80 टीमने त्यांच्या अमूल्य सहकार्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार मानले.

F80 फिटनेस स्टुडिओ – अलिबागमधील फिटनेसचे नवसंस्कार

अलिबागमधील पहिला बॅच-वाईज क्रॉसफिट ट्रेनिंग जिम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या F80 फिटनेस स्टुडिओची स्थापना अद्वैत पाटील यांनी केली आहे. आज येथे १०० हून अधिक सक्रिय सदस्य आहेत आणि १००+ यशस्वी ट्रान्सफॉर्मेशन स्टोरीज स्टुडिओच्या कामगिरीची साक्ष देतात.

येथे क्रॉसफिट, वेट ट्रेनिंग, कार्डिओ, केटलबेल, पारंपरिक गदा-मुडगर प्रशिक्षण, अॅनिमल फ्लो तसेच वैद्यकीय गरजेनुसार उपचारात्मक वर्कआउट्स (जसे गुडघेदुखी, पाठदुखी, स्पॉन्डिलोसिस इत्यादींसाठी) उपलब्ध आहेत.

यावर्षी स्टुडिओच्या दोन सदस्यांनी, शुभम नखाते आणि प्राजक्ता खराडे यांनी ऑल इंडिया योद्धा रेस या देशपातळीवरील कठीण स्पर्धेत भाग घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली.

प्रशिक्षक अंकुश ठाकूर व जयेश मोरे यांच्या सहकार्याने अद्वैत पाटील “मूव्हमेंट इज मेडिसिन” या तत्त्वावर आधारित फिटनेसची नवी दिशा अलिबागकरांना देत आहेत.

“तंदुरुस्तीबरोबर पर्यावरणही महत्त्वाचे!” — F80 चा संदेश

या वृक्षारोपण उपक्रमातून F80 फिटनेस स्टुडिओने आरोग्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचाही आदर्श उभा केला आहे. फिटनेस आणि निसर्ग यांचा संगम घडवत, हा उपक्रम इतर जिम्स आणि संस्थांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

प्रतिनिधी – सत्यमेव जयते न्यूज


Related Articles

Back to top button