ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेसाठी e-KYC सुविधा सुरू

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
मुंबई, 18 सप्टेंबर : महिलांना पारदर्शक व नियमित आर्थिक मदत मिळावी यासाठी “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेसाठी e-KYC प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून मोबाईलवरूनही सोप्या पद्धतीने करता येईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
पुढील दोन महिन्यांत लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले असून, यामुळे या योजनेसह इतर शासकीय योजनांचा लाभ घेणेही सुलभ होणार आहे.




