ताज्या बातम्यारायगड
तुळजाई’ बोट दुर्घटनेतील तिन्ही मच्छीमारांचे मृतदेह सापडले

रायगड : खांदेरीजवळ काल (रविवार) घडलेल्या ‘तुळजाई’ बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या तिन्ही मच्छीमारांचे मृतदेह अखेर सोमवारी (आज) सकाळपर्यंत सापडले आहेत. कालपासून सुरू असलेल्या शोध मोहिमेनंतर आज सकाळी हे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी सापडले. नरेश राम शेलार, धीरज कोळी, रा. कासवला पाडा, उरण, मुकेश यशवंत पाटील हे बेपत्ता झाले होते.
या मृतांमध्ये एकाचा मृतदेह सासवणे किनाऱ्याला, दुसऱ्याचा कीहिम येथे तर तिसऱ्याचा दिघोडे किनाऱ्यावर आढळून आला आहे. स्थानिक बचाव पथक, नौदल आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नातून मृतदेहांचे शोधकार्य पूर्ण करण्यात आले.
दरम्यान, या दुर्घटनेतील सर्व बेपत्ता मच्छीमारांचा शोध पूर्ण झाल्यामुळे पोलिस विभागाकडून पुढील तपास व कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
—