ताज्या बातम्यारायगड
श्रमसंस्कार हेच राष्ट्र विकासाचे प्रेरणास्थान – डॉ. विजय कोकणे
आराठी (श्रीवर्धन) व रसायनी (खालापूर) येथे जन शिक्षण संस्थान रायगडच्यावतीने स्वच्छता श्रमदान आणि प्लास्टिक बंदी जनजागृती कार्यक्रम संपन्न

रायगड : जन शिक्षण संस्थान रायगडच्या वतीने आराठी (श्रीवर्धन) आणि रसायनी (खालापूर) येथे स्वच्छता श्रमदान आणि प्लास्टिक बंदी जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात प्रशिक्षणार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली तसेच मोफत कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
या वेळी संस्थेचे संचालक डॉ. विजय हिरामण कोकणे म्हणाले, “श्रमसंस्कार हेच राष्ट्र विकासासाठी प्रेरक ठरतात.”
कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित लाभार्थ्यांना प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम सांगून पर्यावरणपूरक पर्यायांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात सहकार्य करणाऱ्यांमध्ये –डॉ. अनघा पाटील व डॉ. जितेंद्र पाटील (पाटील हॉस्पिटल, रसायनी) प्रशांत गायकवाड (CSR समन्वयक, बिर्ला कार्बन इंडिया), कल्पना म्हात्रे व भाग्यश्री पुसाळकर (सहायक कार्यक्रम अधिकारी) अरुणा धर्माधिकारी (साधन व्यक्ती), हिमांशू भालकर (कर्मचारी) यांचा सक्रिय सहभाग होता.
या उपक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा सोमैया, अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, उपाध्यक्षा रत्नप्रभा बेल्हेकर आणि संचालक डॉ. विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
संस्थेच्यावतीने 16 ते 31 जुलै या कालावधीत रायगड जिल्ह्यात विविध स्वच्छता आणि जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. कोकणे यांनी दिली.