शरद पवारांचा वारसदार ठरतोय का? रोहित पवारांना मोठी जबाबदारी
रोहित पवार ऑन द रायझ – शरद पवार गटात नवा पॉवर सेंटर

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये मोठे संघटनात्मक बदल झाले आहेत. प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची जागा जरी अन्य नेत्याने घेतली असली तरी पक्षातील पुढील पातळीवरील प्रमुख जबाबदारी आता आमदार रोहित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत याबाबत घोषणा केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस म्हणून तसेच सर्व फ्रंटल आणि सेलच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं की, “यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्या विचारांचा वस्तुपाठ रोहित पवार यांच्या कार्यात दिसतो आहे. त्यांच्या नेतृत्वात पक्ष अधिक बळकट होईल याची खात्री आहे.”
नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात शिव, फुले, शाहू, आंबेडकर या विचारधारेवर अधिष्ठित संघटना उभी राहील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच रोहित पवार यांना नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.