ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

33.58 कोटींचा ‘पेंटहाऊस बूम’; अलिबाग समुद्रकिनारा बनतोय गुंतवणूकदारांचे नवे केंद्र

पाच बेडरूम पेंटहाऊसच्या हाय-वॅल्यू व्यवहाराने अलिबागच्या रिअल इस्टेटला नवा बेंचमार्क


 सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
अलिबाग : तालुक्यात तब्बल 33 कोटी 58 लाख 41 हजार 771 रुपयांचा विक्रमी व्यवहार नोंदवला गेल्याने स्थानिक रिअल इस्टेट बाजारात मोठी हलचल निर्माण झाली आहे. उपनोंदणी कार्यालय, अलिबाग येथे दस्त क्रमांक 6148/2025 अंतर्गत पाच बेडरूमचा पेंट हाऊस 856.37 चौ.मी. क्षेत्रफळाचा (9218 चौरस फूट ) चा व्यवहार नोंदवण्यात आल्याचे उपलब्ध कागदपत्रावरून दिसून येते.
अलिबाग परिसरात गेल्या काही वर्षांत जलद गतीने वाढणारी विकासकामे, मुंबई-पुण्याशी जवळीक, पर्यटन आणि सेकंड होम कल्चरमुळे जमिनींचे भाव सातत्याने वाढतच आहेत. त्यातच या व्यवहाराने अलिबाग तालुक्याच्या रिअल इस्टेट बाजाराला नवे आयाम मिळाल्याचे स्थानिक मालमत्ता तज्ज्ञांचे मत आहे.
हा भूखंड लोढा डेव्हलपर्स लिमिटेडतर्फे ऑथोराइज सिग्नेटरी बर्नार्ड सोरेस यांच्यावतीने राहुल बंडेकर, फोर्ट-मुंबई यांनी व्यवहारासाठी सादर केला. भूखंड खरेदी करणाऱ्यांमध्ये अनंता प्रायव्हेट ट्रस्ट आणि अनीवेरदा प्रायव्हेट ट्रस्ट यांचा समावेश असून दोन्ही ट्रस्टकडून वॉर्मंड फीदुशियरी सर्विसेस लिमिटेडमार्फत अधिकृत प्रतिनिधी मीरा एस. अय्यर यांनी दस्ताची प्रक्रिया पूर्ण केली. मोबदला म्हणून नमूद केलेली रक्कम 33.58 कोटी इतकी असून यावर आधारित 1 कोटी 17 लाख 56 हजार 500 रुपयांचे नोंदणी शुल्क आकारण्यात आले. अलिबागच्या प्रिमियम रिअल इस्टेट बाजारासाठी हा व्यवहार नवा बेंचमार्क ठरत असून उच्च-मूल्य गुंतवणुकीच्या वाढत्या कलाला अधिक चालना मिळाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
कोस्टल कनेक्टिव्हिटी, पर्यटनवाढ, सेकंड-होम मागणी आणि मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर अलिबागमध्ये आगामी काळात अशाप्रकारचे हाय-व्हॅल्यू व्यवहार आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
…..

Related Articles

Back to top button