हरित महाराष्ट्रासाठी एक पाऊल पुढे : मंडळ अधिकारी कार्यालयाच्या वतीने वृक्षारोपण उपक्रम उत्साहात पार

पोयनाड (प्रतिनिधी) – “हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” या राज्य शासनाच्या उपक्रमाला पाठिंबा देत पोयनाड व चरी मंडळ अधिकारी कार्यालयाच्या वतीने दिनांक ३ ऑगस्ट रोजी पोयनाड विभागात वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
राज्य सरकारच्या १० कोटी वृक्ष लागवडीच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी परिसरात विविध प्रकारची रोपे लावण्यात आली तसेच ती जगवण्याचा संकल्प उपस्थित मान्यवरांनी केला.
कार्यक्रमास मंडळ अधिकारी पोयनाड निवास मेतरी, मंडळ अधिकारी चरी रविदास जाधव, तलाठी पोयनाड पूजा भगत, तलाठी शहाबाज शिल्पा कवठे, तलाठी कुसुंबळे विकास सातव, तलाठी शहापूर सतिष ढवळे, कोतवाल पोयनाड देवेंद्र ओव्हाळ, कोतवाल शहापूर विजय पाटील, झुंझार युवक मंडळाचे सचिव किशोर तावडे, खजिनदार दीपक साळवी व अॅड. पंकज पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती.
- सर्वांनी मिळून परिसरात हिरवळ फुलवण्याचा संकल्प करीत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला