ताज्या बातम्यारायगड
८०० कोटींचा मैलाचा दगड गाठून ‘आदर्श’चे १००० कोटींकडे पाऊल

रायगड : सभासद, हितचिंतक, कर्जदार, ठेवीदार आणि अनन्या बचत योजनेतील बालमित्र यांच्या विश्वास व सहकार्यामुळे ‘आदर्श पतसंस्था’ने आजपर्यंत ८०० कोटी रुपयांपेक्षा अधिक एकत्रित व्यवसायाची नोंद केली आहे. संस्थेने ही कर्तबगारी साध्य केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देत यावर्षी १००० कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसायाचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे.
संस्थेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या पत्रकात, “हे यश हे सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे. आता आपण सर्व मिळून १००० कोटींचे स्वप्न सत्यात उतरवूया,” असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अहवाल संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, तो येथे डाउनलोड करता येईल.