ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
“३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदांचं आरक्षण जाहीर; दिवाळीनंतर सत्तासंग्राम पेटणार!”
ग्रामविकास विभागाची घोषणा; महिला, एससी-एसटी आणि मागास प्रवर्गाला मोठा वाटा

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम आता केव्हाही वाजू शकतात. दिवाळीनंतर या निवडणुका पार पडणार हे जवळपास निश्चित असून, दोन टप्प्यात निवडणुका घेण्याची शक्यतादेखील व्यक्त केली जात आहे. बिहारप्रमाणेच महाराष्ट्रातही मतदार याद्यांची सखोल फेरतपासणी करण्याचा प्लॅन केंद्रीय निवडणूक आयोगाने आखला आहे.

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाकडून गडबडीत तयारी सुरू असतानाच ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींसाठीचे आरक्षण जाहीर करून राजकीय वातावरण आणखी तापवलं आहे.
एकूण ३४ जिल्हा परिषदा – कुठे सर्वसाधारण, कुठे महिला, कुठे अनुसूचित जाती-जमाती, तर कुठे मागासवर्ग अशा फॉर्म्युल्यांवर अध्यक्षपद वाटण्यात आलं आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचं आरक्षण
ठाणे – सर्वसाधारण (महिला)
पालघर – अनुसूचित जमाती
रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, पुणे, बुलढाणा, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर – सर्वसाधारण सर्वसाधारण
सांगली, कोल्हापूर, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली – सर्वसाधारण (महिला)
नंदुरबार, पालघर – अनुसूचित जमाती
अहिल्यानगर, अकोला, वाशिम – अनुसूचित जमाती (महिला)
परभणी, हिंगोली, वर्धा – अनुसूचित जाती
बीड, चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)
रत्नागिरी, धुळे, सातारा, जालना, धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सोलापूर, नांदेड, नागपूर, भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
या आरक्षण घोषणेमुळे आता सर्वच पक्षांना आपापली गणितं जुळवावी लागणार आहेत. कोणत्या जिल्ह्यात कोणाला तिकीट द्यायचं, कोणाची जोपासना करायची आणि कुठे गटबाजीचा फडशा पाडायचा, यावर चढाओढ सुरू होणार हे नक्की.
दिवाळीनंतरच्या निवडणुकांसाठीचे बिगुल आता वाजले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय पक्षांची धावपळ सुरू झाली असून, पुढील काही दिवसांत निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
…..




