ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्रमुंबईरायगड

सुरेल आठवणींचा सोहळा, सिंग अलॉंग म्युझिक हबचा एक वर्षांचा सुरेल प्रवास !


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग : संगीतप्रेमींसाठी आनंदाचा क्षण! ‘सिंग अलॉंग म्युझिक हब’ या लोकप्रिय कराओके क्लबला काल (३ ऑक्टोबर) रोजी एक वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने विशेष वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हबचे सर्व सदस्य, संगीतप्रेमी मित्र-मैत्रिणी, तसेच नवीन सहभागी मोठ्या उत्साहात या कार्यक्रमास उपस्थित राहिले.
या विशेष प्रसंगी सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत गेल्या वर्षभरातील सुंदर आठवणींना उजाळा दिला. अनेक सदस्यांनी आपले अनुभव सांगताना हबने त्यांच्या आयुष्यात केलेला सकारात्मक बदल व्यक्त केला. कराओकेच्या माध्यमातून आपले गायन छंद जपण्यासाठी आणि नवे मित्र मिळवण्यासाठी सिंग अलॉंग म्युझिक हबने दिलेला व्यासपीठ सर्वांनी कौतुकास्पद ठरवला.
कार्यक्रमात जुन्या आणि नव्या सदस्यांनी  एकमेकांना शुभेच्छा देत “सिंग अलॉंग” कुटुंबाची एकजूट अधिक बळकट करण्याचा निर्धार केला.
शेवटी आयोजकांनी सर्व सदस्यांचे आभार मानत, “आपल्या सर्वांच्या प्रेम आणि सहकार्यामुळेच आज हब इथपर्यंत पोहोचला आहे. येणाऱ्या काळात आणखी कार्यक्रम, स्पर्धा आणि संगीतप्रेमींसाठी नवनवीन उपक्रम राबवण्याचा आमचा मानस आहे,” असे सांगितले.
संगीतप्रेमी सदस्यांनी “सिंग अलॉंग म्युझिक हब”ला पुढील अनेक यशस्वी वर्षांसाठी शुभेच्छा दिल्या आणि भविष्यातही असेच प्रेम आणि साथ राहो अशी मनोकामना व्यक्त केली

Related Articles

Back to top button